पंतप्रधानांच्या दौऱ्या आधी धनगर समाजातील नेत्यांची धरपकड

Foto

सोलापूरधनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून धनगर समाजातील नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार होते. पंतप्रधान आज (बुधवारी) सोलापूर दौऱ्यावर असून या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये धनगर समाजाच्या नेते आणि कारुयाकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे. सुमारे १०० कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी सोलापुरात येऊन विविध शासकीय योजनांच्या कामांचे भूमिपूजन, पायाभरणी व लोकार्पण करणार आहेत. या निमित्ताने इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी सुमारे ५० हजारांचा जनसमुदाय उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. मोदी यांच्यासमवेत केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहनिर्माणमंत्री हरजितसिंह पुरी, राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित राहणार आहेत.

 

मोदी यांच्या सभेवर सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजाने बहिष्कार घातला आहे. पंढरपुरात झालेल्या धनगर समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. धनगर समाजाने भाजपास मोठ्या आशेने मतदान केले होते. पण धनगर समाजाच्या मतांच्या जोरावर राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळवल्यानंतर देखील सरकारने आरक्षणाबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. धनगर समाज आता पुन्हा भुलथापांना बळी पडणार नाही हे दाखवून देण्यासाठीच मोदींच्या सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे धनगर समाजाच्या नेत्यांनी म्हटले होते.

मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून सुरक्षेच्या दृष्टीने धनगर नेत्यांची धरपकड करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker